मालवाहू ट्रकच्या धडकते दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, कडा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 14:26 IST2023-02-15T13:40:11+5:302023-02-15T14:26:16+5:30

ही घटना बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली.

two man hit by a cargo truck in Kada, beed | मालवाहू ट्रकच्या धडकते दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, कडा येथील घटना

मालवाहू ट्रकच्या धडकते दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, कडा येथील घटना

नितीन कांबळे 

कडा - येथील बाजार समितीमध्ये बुधवारी कांद्याचा लिलाव असल्याने खिळद येथील शेतकरी दुचाकीवर येत असताना पैठण-बारामती रोडवर भरधाव मालवाहु ट्रकने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब गर्जे(वय ४५) आणि नारायण गोल्हार(वय ४३) असे मयतांची नावे आहेत.

आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याचा लिलाव असल्याने या लिलावासाठी खिळद येथील शेतकरी बाबासाहेब गर्जे व नारायण गोल्हार हे दुचाकी(क्रमांक M.H.16, B.F.9573) वरुन येत असताना पैठण बरामती रोडवर लोंखडाने भरलेला ट्रक क्रमांक( M.H.12, E.F. 3646) याने पाठीमागून जोरांची धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर घडली.

दुचाकी एक किलोमीटर अंतरावर ओढत नेली
ट्रक चालकांने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. एवढे होऊनही ट्रक चालकाने ट्रकखाली गुतलेली दुचाकी एक किलोमीटर अंतरावर ओढत नेल्याची घटना घडली. अखेर लोकांनी ट्रक आडवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: two man hit by a cargo truck in Kada, beed