तांड्यावरील दोन घरे फोडून दोन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:09 IST2019-06-04T00:09:18+5:302019-06-04T00:09:55+5:30

बीड : गेवराई तालुक्यातील चकलांबा ठाणे हद्दीतील गोविंनदनगर तांड्यावर रविवारी पहाटे चोरांनी धुमाकूळ घालत दोन घरे फोडून दोन लाखांचा ...

Two lakhs of stolen goods were stolen and two lakh stolen | तांड्यावरील दोन घरे फोडून दोन लाखांची चोरी

तांड्यावरील दोन घरे फोडून दोन लाखांची चोरी

बीड : गेवराई तालुक्यातील चकलांबा ठाणे हद्दीतील गोविंनदनगर तांड्यावर रविवारी पहाटे चोरांनी धुमाकूळ घालत दोन घरे फोडून दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी चकलांबा ठाण्यात नोंद झाली आहे.
गोविंदनगर तांड्यावरील सुंदराबाई शिवाजी राठोड (५५) यांचे कुटुंबीय शनिवारी रात्री जेवण करुन झोपी गेले. रविवारी पहाटेच्या सुमारास चोरांनी घराच्या मागील खिडकी उघडून आत प्रवेश केला. लोखंडी पेटीतील रोख ५० हजार रुपये, सोन्याचे दागिने असा १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज त्यांनी लांबविला. त्यानंतर चोरांनी आपला मोर्चा उत्तम पांडुरंग राठोड यांच्या घराकडे वळविला. चॅनेलगेट तोडून चोर आत घुसले. एक तोळ्याचे दागिने व रोख १० हजार रुपये चोरांनी लांबविले. दोन्ही घरांमधून चोरांनी २ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी सुंदराबाई राठोड यांच्या फिर्यादीवरुन चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: Two lakhs of stolen goods were stolen and two lakh stolen