धारूरमध्ये कार-बाईक अपघातात दोघे जागीच ठार; एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 19:00 IST2019-04-19T19:00:45+5:302019-04-19T19:00:45+5:30
अपघातानंतर चालक फरार झाला आहे

धारूरमध्ये कार-बाईक अपघातात दोघे जागीच ठार; एक गंभीर जखमी
धारूर (बीड ) : चोंराबा ते चारदरी या रस्त्यावर गुरुवारी रात्री झालेल्या कार व बाईकच्या अपघातामध्ये दोनजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधीक माहीती आशी की, चोरंबा पासून एक किलोमीटर अंतरावर चारदरी रस्त्यावर बाईक ( क्रमांक एम एच12 - 8015 ) या गाडीला भरधाव कारने ( क्रमांक एम एच 14 डि ए 1842 ) धडक दिली. यात अंकुश मारूती नाईकवाडे ( 19, रा.अंबेवडगाव ) व मनीषा सुभाष मयेकर (36,रा.तरी ) हे दोघे जागीच ठार झाले. तर सुरज सुभाष मयेकर (१६ ) हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात सुरु आहेत.
अपघातानंतर चालक फरार झाला असून त्याच्याविरोधात धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे हे करत आहेत.