मोटारसायकल अपघातात दोन ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:38 IST2019-04-08T00:37:51+5:302019-04-08T00:38:09+5:30
बीड - धामणगाव - नगर रोडवरील खिळद फाटा येथे अज्ञात चारचाकी वाहनाने चकवा दिल्याने दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन ठार तर एक गंभीर झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

मोटारसायकल अपघातात दोन ठार, एक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : बीड - धामणगाव - नगर रोडवरील खिळद फाटा येथे अज्ञात चारचाकी वाहनाने चकवा दिल्याने दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन ठार तर एक गंभीर झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
आष्टी तालुक्यातील खिळद येथील सुरेखा मारूती गर्जे (वय ४०, रा. खिळद) या सोनई येथे भावाकडे गेल्या होत्या. दुपारी त्या डोईठाण येथे बसमधून उतरून डोईठाणवरून पतीच्या गाडीवरून खिळद गावाकडे जात होत्या. राहुल विश्वंभर खंडागळे (वय ३२, रा. शिदेवाडी, ता. आष्टी) हा धामणगावकडून शिंदेवाडीकडे मोटारसायकलवर जात होता.
अचानक एका अज्ञात चारचाकी वाहनाने चकवा दिल्याने दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत सुरेखा गर्जे व राहुल खंडागळे हे दोघेही जागीच ठार झाले तर मारुती गर्जे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंभोरा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.