दोन अपघातांत दोन ठार, नऊ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:54 IST2019-05-14T23:54:38+5:302019-05-14T23:54:59+5:30

मंगळवारी जिल्ह्यातील आष्टी व गेवराई तालुक्यात झालेल्या दोन अपघातात दोन जण ठार तर नऊ जण जखमी झाले.

Two killed and nine injured in two accidents | दोन अपघातांत दोन ठार, नऊ जण जखमी

दोन अपघातांत दोन ठार, नऊ जण जखमी

बीड : मंगळवारी जिल्ह्यातील आष्टी व गेवराई तालुक्यात झालेल्या दोन अपघातात दोन जण ठार तर नऊ जण जखमी झाले.
आष्टी तालुक्यात पोलीस जीप आणि कारचा समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर आठ जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी पहाटे पाच वाजता झाला. बाळासाहेब दादाराव देवगडे (वय ४५) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
केज तालुक्यातील लहुरी येथील देवगडे हे सध्या डोंबिवली येथे राहतात. सोमवारी रात्री देवगडे कुटुंब व नातेवाईक डोंबिवली येथून कारने (एमएच०१- बीके ९२४९) मूळ गावी लहुरीकडे निघाले होते. मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास आष्टी पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर पोलीस जीप (एमएच २३-एफ १११७) आणि त्यांच्या कारची धडक झाली. यात कारमधील बाळासाहेब देवगडे जागीच ठार झाले. तर किशोर बाळासाहेब देवगडे (२३), सोनाली देवगडे (२०) (दोघे रा. लहूरी, ता. केज), वसंत डागे (२५) , सुमन वसंत डांगे (२३) (दोघेही रा. कोल्हेवाडी ता.केज), तसेच आर्यन व आराध्या ही चिमुकलेही जखमी झाले. तर पोलिस जीपमधील चालक हनुमंत बागर, विठ्ठल नरवडे हे जखमी झाले. फौजदार डॉ. विशाल शहाणे, पो. ह. गणेश भोसले, पो. कॉ. सचिन कोळेकर, पो. ह. नवनाथ काळे, पो. ना. पांडूरग दराडे, पो. कॉ. अनिल राऊत यांनी तात्काळ जखमींना येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

Web Title: Two killed and nine injured in two accidents