बीडमध्ये चोरी-घरफोडी करणारे दोन अट्टल गुन्हेगार जिह्यातून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 17:34 IST2019-01-23T17:33:47+5:302019-01-23T17:34:14+5:30

गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार केले आहे.

two criminals who have Exile from Beed | बीडमध्ये चोरी-घरफोडी करणारे दोन अट्टल गुन्हेगार जिह्यातून हद्दपार

बीडमध्ये चोरी-घरफोडी करणारे दोन अट्टल गुन्हेगार जिह्यातून हद्दपार

बीड : बीड शहरासह परिसरात चोरी, घरफोडी आणि जबरी चोरी असे गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार केले आहे. ही कारवाई बुधवारी पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी केली. 

विकी राजु कांबळे (रा.राजुरी वेस, बीड) व सुयोग ऊर्फ छोटू मच्छिंद्र प्रधान (रा.गयानगर, बीड) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांविरुद्ध शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव वरीष्ठांकडे पाठवला होता. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.  घनश्याम पाळवदे  यांनी  पाठपुरावा केला होता, नंतर उपाधीक्षक सुधीर खिरडकर यांनी या प्रस्तावाची चौकशी करत दोघांनाही दोन वषार्साठी हद्दपार करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दोघांना एक वषार्साठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले.

Web Title: two criminals who have Exile from Beed