शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकारी मारहाणप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल; आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:30 IST

नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील हे कार्यालयीन कामकाज आटोपून निघाले असता त्यांच्यावर कार्यालय परिसरात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास स्थापत्य ...

नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील हे कार्यालयीन कामकाज आटोपून निघाले असता त्यांच्यावर कार्यालय परिसरात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास स्थापत्य अभियंता सुमितकुमार मेटे यांचे नातेवाईक दिलीप उध्दव मेटे व सुनील लक्ष्मण कदम यांनी अचानक चाकू, लोखंडी राॅडने जबर मारहाण केली. यामध्ये मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांच्या उजव्या हाताला गंभीर जखम झाली असून मांडीवर व अंगावर मुक्का मार दिला आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिसांत दिलीप उध्दव मेटे व सुनील लक्ष्मण कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला २० जानेवारी रोजी वडवणी न्यायालयात हजर केले असता न्या. एल. एम. पठाण यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मनोज जोगदंड, लहू वाघमारे हे करत आहेत.