सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखी दोघांना अटक; मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 10:01 IST2025-01-04T09:37:17+5:302025-01-04T10:01:30+5:30

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Two arrested in Santosh Deshmukh murder case one still absconding | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखी दोघांना अटक; मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखी दोघांना अटक; मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

Beed Sarpanch Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी फरार असलेल्या दोघांना २५ दिवसांनी अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तिसऱ्या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत. सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासाद्वारे दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांचा समावेश होता. तर आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले , कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे हे फरार होते. या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करत फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटी पथकाने सुदर्शन घुलेवर लक्ष केंद्रित केले होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हाच मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे सीआयडीच्या पथकाकडून सुदर्शनचा शोध सुरू होता.  सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन्ही आरोपी राज्याबाहेर लपल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

कोण आहे सुदर्शन घुले?

२७ वर्षीय सुदर्शन घुले बीडमधील केज तालुक्यातील टाकळी गावचा आहे. नेत्यांच्या सांगण्यावरुन धमकावणं तसंच मारहाण आणि चोरी करण्याचे आरोप सुदर्शन घुलेवर आहेत. घुलेचे घर पत्र्याचे असले तरी त्याच्याकडे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी होती. ६ डिसेंबरला मस्साजोग गावातील पवनचक्कीच्या वादात  सुदर्शन घुले देखील होता. पवनचक्की प्रकल्पामध्ये जात असताना सुदर्शन घुलेचा सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला होता. यावेळी संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासोबतही घुलेचा वाद झाला. या वादाचे हाणामारीत रुपांतर झालं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.
 

Web Title: Two arrested in Santosh Deshmukh murder case one still absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.