शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवणारा संस्थाचालक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 19:33 IST2019-08-09T19:19:20+5:302019-08-09T19:33:41+5:30

मागील सहा महिन्यांपासून संस्थाचालकाचा त्रास

trustee arrested who send obscene message to teacher | शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवणारा संस्थाचालक अटकेत

शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवणारा संस्थाचालक अटकेत

कडा (बीड ) : गंगादेवी येथे एका खाजगी संस्थेच्या शाळेवरील शिक्षिकेस मोबाईलवर अश्लील मेसेज करून त्रास देणार्‍या संस्थाचालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश शिवाजी पालवे असे विनयभंग केलेल्या संस्थाचालकाचे नाव असून त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  अंकुश शिवाजी पालवे ( रा.तिसगांव तालुका पाथर्डी ) याची गंगादेवी येथे एक खाजगी शिक्षण संस्था आहे. याच संस्थेच्या इंग्लिश स्कूलवर एक विवाहित महिला शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, त्यांनी सहा महिन्यांपूर्वी राजीनामा दिला. मात्र, तेव्हापासून संस्थाचालक पालवे हे सदरील शिक्षिकेस मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवत. हा त्रास वाढल्याने शिक्षिकेने अखेर गुरूवारी अंभोरा पोलिस ठाण्यात संस्थाचालक पालवे याच्या विरूध्द विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली , पोलिस उपनिरीक्षक राहुल लोखडे करीत आहेत.

Web Title: trustee arrested who send obscene message to teacher