मुलीवर अत्याचार; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:56 IST2019-12-13T23:54:29+5:302019-12-13T23:56:41+5:30
बीड : तालुक्यातील मैंदा येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पिंपळनेर पोलिसांनी कारवाई करत ...

मुलीवर अत्याचार; दोघांना अटक
बीड : तालुक्यातील मैंदा येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पिंपळनेर पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे.
मैंदा येथील अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल होताच पिंपळनेर पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना केले होते. माजलगाव व वडवणी तालुक्यात आरोपी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम हाती घेतली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि शरद भुतेकर, पीएआय सानप, पोलीस कर्मचारी शेख बुºहाण, जमादार राठोड, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई करत ज्ञानेश्वर मोमीन व त्याचा सहकारी शंकर मोरे यांना माजलगाव व वडवणी येथून अटक केली.