'आज माझा शेवटचा दिवस'; असे स्टेट्स ठेवून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 20:02 IST2022-07-08T19:58:28+5:302022-07-08T20:02:00+5:30

आसोला येथील तरूणाची धारूरमध्ये विषारी द्रव्य प्राशन करून केली आत्महत्या

‘Today is my last day’; Young man commits suicide by keeping such status | 'आज माझा शेवटचा दिवस'; असे स्टेट्स ठेवून तरुणाची आत्महत्या

'आज माझा शेवटचा दिवस'; असे स्टेट्स ठेवून तरुणाची आत्महत्या

किल्लेधारूर (बीड ): 'आज माझा शेवटचा दिवस' , 'कृष्णा मरण पावला', असे स्टेट्स अपडेट करून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धारूर येथे आज दुपारी उघडकीस आली. श्रीकृष्ण मोहन चोले ( २७) असे मृताचे नाव असून तो तालुक्यातील आसोला येथील रहिवासी आहे.  

आसोला येथील युवक श्रीकृष्ण मोहन चोले गावाकडून आज सकाळी धारूर येथे आला. बसस्थानकाच्या शेजारील मोकळ्या मैदानात काही वेळ तो रेंगाळला. त्यानंतर त्याने विषारी द्रव्य प्रश्न केले. त्याची तडफड पाहून नागरिकांनी त्याला धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. 

या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीकृष्ण याने विषारी द्रव्य प्राशन करण्यापूर्वी 'आज माझा शेवटचा दिवस', 'श्रीकृष्ण मरण पावला', असे स्टेट्स सोशल मिडीयावर ठेवले होते. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. मृताचे वडील आषाढी वारीला पायी दिंडीत गेल्याची माहिती आहे. 

Web Title: ‘Today is my last day’; Young man commits suicide by keeping such status