तिकिटाचे पैसे स्वत:च्या खिशात; माजलगावात एसटी महामंडळाचे तीन वाहक निलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 17:23 IST2019-03-07T17:22:40+5:302019-03-07T17:23:26+5:30

या कारवाईने राज्य परिवहन महामंडळात खळबळ उडाली आहे.

Ticket money in their own pocket; Suspended three carriers of ST corporation in Majalgaon | तिकिटाचे पैसे स्वत:च्या खिशात; माजलगावात एसटी महामंडळाचे तीन वाहक निलंबीत

तिकिटाचे पैसे स्वत:च्या खिशात; माजलगावात एसटी महामंडळाचे तीन वाहक निलंबीत

माजलगाव (बीड) : बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटे न देता अर्धे पैसे घेऊन ते स्वत:च्या खिशात घालणाऱ्या तीन वाहकांचे निलंबन करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी माजलगाव आगारात करण्यात आली. या कारवाईने राज्य परिवहन महामंडळात खळबळ उडाली आहे.

डी.बी. साळवे, व्ही.एस.सिरसीवाड, पी.डी.राठोड असे निलंबीत केलेल्या तीन वाहकांची नावे आहेत. माजलगाव येथील आगारातून दररोज शेकडो बसेस जातात आणि येतात. त्यामुळे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. त्यातच परिसरातील ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावरील बसेसमध्ये वाहक कर्तव्य बदलून घेण्यात कुचराई करतात. रोज रोज त्याच मार्गावरील बसमध्ये कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांना कोणता प्रवासी नियमित आणि कोणता नाही, हे समजते. नियमित प्रवाशांना तिकीट न देता त्यांच्याकडून तिकिटाच्या अर्धे पैसे घ्यायचे आणि ते स्वत:च्या खिशात घालयचे. असा काहीसा प्रकार वाढला होता.

ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बस तपासली आणि यामध्ये तीनही वाहक दोषी आढळले. त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्रवाशांनीही पूर्ण तिकिट घेऊनच प्रवास करावा. वाहक तिकिट देत नसेल तर ते मागवून घ्यावे, अन्यथा प्रवाशांवरही कारवाई होऊ शकते, असे आगारप्रमुख डी.बी.काळम यांनी सांगितले.

Web Title: Ticket money in their own pocket; Suspended three carriers of ST corporation in Majalgaon