परळीत थरार ! जुन्या भांडणातून दोन गटात तलवारबाजी; पाचजण जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 07:24 PM2021-02-16T19:24:20+5:302021-02-16T19:25:21+5:30

जुन्या भांडणाच्या कारणावरून आपसात एकमेकांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याच्या उद्देशाने धमक्या दिल्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Thrill in the Parali ! Fencing in two groups from old quarrels; Five injured | परळीत थरार ! जुन्या भांडणातून दोन गटात तलवारबाजी; पाचजण जखमी 

परळीत थरार ! जुन्या भांडणातून दोन गटात तलवारबाजी; पाचजण जखमी 

Next

परळी : शहरातील भोई गल्लीत  सोमवारी सायंकाळी आपसातील दोन गटात तलवारबाजी होऊन काठ्याने मारहाण करण्यात आली .यामध्ये दोन्ही गटाचे एकूण पाच जण जखमी झाले आहेत. यातील दोघांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मंगळवारी पहाटे  एकूण 14 जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जुन्या भांडणाच्या कारणावरून आपसात एकमेकांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याच्या उद्देशाने धमक्या दिल्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हातात तलवारी व काठ्या घेऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून दोघांना अंबाजोगाईच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेख एजाज गौस ( 32, रा. भोई गल्ली, परळी ) यास अटक केली आहे. तर या मारामारी प्रकरणी शेख एजाज, मुज्जू खान ,गफार सय्यद , अज हर खान,शेख नदीम ,शेख शहानवाज व अन्य आठ जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी  अंबाजोगाई उपविभागीय पोलिस अधिकारी  सुनील जायभाये,परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम,स पो नी. प्रदीप एकशिंगे ,अशोक खरात यांनी भेट दिली. 

सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे मंगळवारी पहाटे याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हनुमान मुंडे ,गोविंद भताने, राठोड व आर सी पी चे जवान तातडीने दाखल झाल्याने पुढील अनर्थ  टळला . घटनास्थळाहून पोलिसांनी एक तलवार जप्त केली .पोलीस येताच मारामारी करणारे पळून गेले.या प्रकरणी पोलीस नाईक हनुमान मुंडे यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे..तपास स. पो.नी अशोक खरात हे करीत आहेत

Web Title: Thrill in the Parali ! Fencing in two groups from old quarrels; Five injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.