परळीत थरार! अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 13:23 IST2024-05-27T13:22:41+5:302024-05-27T13:23:28+5:30
धडक कोणत्या वाहनाने दिली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी पुढील तपास संभाजीनगर ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

परळीत थरार! अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
परळी: येथील थर्मल रोडवर रविवारी रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान भरधाव अज्ञात चरचाकीने दोन दुचाकींना चिरडले. यात एका दुचकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचकीवरील एकजण गंभीर जखमी आहे. कॉन्ट्रॅक्टर सय्यद अब्दुल जब्बार ( 60, रा - बरकत नगर) आणि कामगार अजय जमूनाराव चौधरी ( 45, रा.परळी) अशी मृतांची नावे आहेत.
शहरातील थर्मल रोडवरील चेंबरी विश्रामगृह समोरील रस्त्यावर रविवारी रात्री एका अज्ञात चारचाकी वाहन भरधाव वेगात जात होते. याचवेळी थर्मल रोडवरून परळीकडे एका दुचाकीवर बरकत नगर येथील कॉन्ट्रॅक्टर सय्यद अब्दुल जब्बार आणि कामगार अजय जमूनाराव चौधरी हे दोघे जात होते. साडेसात वाजेच्या सुमारास दोघांच्या दुचकीला भरधाव वेगातील अज्ञात चारचाकी वाहनाने चिरडले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर याच ठिकाणी अन्य एक दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक कोणत्या वाहनाने दिली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी पुढील तपास संभाजीनगर ठाण्याचे पोलीस करीत आहेत.
तपास सुरू आहे
परळीच्या थर्मल रोडवर मोटरसायकलवरिल दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक मोटरसायकलस्वार जखमी झाला आहे. परंतु नेमका अपघात कश्यामुळे झाला हे पोलीस तपासात निष्पन्न होईल
-उस्मान शेख ,पोलीस निरीक्षक संभाजीनगर पोलीस ठाणे परळी