शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

आष्टीत थरार ! पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याची झडप; दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 2:13 PM

सोलेवाडीमधील विकास झगडे हे शेतकरी सकाळी आपल्या शेतात ज्वारीला पाणी देत होते.

ठळक मुद्दे घटनास्थळी आ. सुरेश धस यांनी धाव घेऊन शेतकरी विकास झगडे यांची विचारपूस केली.

- अविनाश कदम 

आष्टी : तालुक्यातील सोलेवाडी येथे गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान ज्वारीला पाणी देण्याऱ्या शेतकऱ्यावर अचानक बिबट्याने झडप मारली. हिम्मत राखून शेतकऱ्याने जोरदार प्रतिकार केल्याने त्याचा जीव वाचला आहे. विकास झगडे ( 60 ) असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीला व पायाच्या पंजाला जखम झाली आहे. दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहेत. 

सोलेवाडीमधील विकास झगडे हे शेतकरी सकाळी आपल्या शेतात ज्वारीला पाणी देत होते. अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली. मात्र त्यांनी हातातील कोयता आणि बैलाचे घागडमाळ याच्या सहाय्याने जोरदार प्रतिकार केला. यामुळे त्यांचा जीव वाचला. हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले असून आष्टी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. याबाबत डॉ. रूपाली बागर यांनी त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सागितले आहे. दरम्यान, वन क्षेत्रपाल शाम शिरसाट नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच घटनास्थळी आ. सुरेश धस यांनी धाव घेऊन शेतकरी विकास झगडे यांची विचारपूस केली. सोलेवाडीतील शेतकर्‍यांना सावध राहण्याचे त्यांनी सांगितले.

नागरिक भयभीत परिसरात वनविभागाचे अनेक पथके तैनात असूनही बिबट्या अद्यापपर्यंत जाळ्यात अडकला नाही. यामुळे पारगाव, सोलेवाडी, जामगाव, आष्टा, आंधळेवाडी या परिसरातील शेतकरी व नागरिकांत भिंतीचे वातावरण आहे. बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीleopardबिबट्याBeedबीड