शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

बीड, वडवणी, बनसारोळ्यात तीन तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:12 AM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बीड पोलिसांनी आर्म अ‍ॅक्टरच्या कारवायांवर भर दिला आहे. बीड शहरासह वडवणी व केजमधील बनसारोळा येथे तीन तलवारी जप्त करण्यात आल्या.

ठळक मुद्देगुन्हे दाखल : स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाया, परळीत संभाजीनगर पोलिसांची कारवाई

बीड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बीड पोलिसांनी आर्म अ‍ॅक्टरच्या कारवायांवर भर दिला आहे. बीड शहरासह वडवणी व केजमधील बनसारोळा येथे तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हेही दाखल केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाया केल्या आहेत.वडवणी शहरात अट्टल गुन्हेगार रणजीतसिंह नानकसिंग टाक (२७ गोपाळनगर, वडवणी) याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी तलवार जप्त केली. त्याच्याविरोधात वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दिलीप तेजनकर, विकास वाघमारे, विष्णू चव्हाण, सुग्रीव रूपनर, मुद्दसर सिद्दीकी यांनी ही कारवाई केली.दुसरी कारवाई बीड शहरातील पेठबीड भागात सपोनि अमोल धस यांच्या टिमने केली. सचिन हनुमान आवारे (वय २४, रा. बलभीमनगर) याच्या घरातून तलवार जप्त केली. त्याला पेठबीड पोलिसांच्या स्वाधीन केले.ही कारवाई सपोनि अमोल धससह नसीर शेख, सखाराम पवार, गोविंंद काळे, रामदास तांदळे, राजू वंजारे यांनी केली.तीन जिवंत काडतुसासह गावठी कट्टा जप्तपरळी : शहरातील कृष्ण नगर भागात संभाजीनगर पोलिसांनी सोमेश्र्वर साहेबराव गित्ते (२० रा.कृष्णनगर, परळी) याला ताब्यात घेत त्याच्याकडून तीन जिवंत काडतुसांसह एक गावठी कट्टा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. त्याच्याविरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई अपर अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, जमादार विलास देशमुख, पोना सचिन सानप, बाबासाहेब आचार्य आदींनी केली.तो तलवार घेऊन खुलेआम फिरायचाकेज तालुक्यातील बनसारोळा येथे सुरेश गायकवाड (४४) हा खुलेआम तलवार घेऊन फिरत होता. हीच माहिती एलसीबीच्या विशेष पथकाला मिळाली. त्यांनी अचानक छापा मारून सुरेशला तलवारीसह बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोह बालाजी दराडे, कल्याण तांदळे, नरेंद्र बांगर, सतीश कातखडे, सुस्कर यांनी केली. एकाच दिवशी तीन मोठ्या कारवाया झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अजित बोºहाडे, एलसीबी पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी या टिमचे स्वागत केले.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी