ऊसतोड मुकादमाचे तीन लाख रुपये केले लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 19:43 IST2018-10-17T19:43:08+5:302018-10-17T19:43:37+5:30

मालेवाडी तांडा येथील एका ऊसतोड मुकादमाचे मजुरांना वाटण्यासाठी बँकेतून काढलेले ३ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. 

Three lakh rupees looted in parali | ऊसतोड मुकादमाचे तीन लाख रुपये केले लंपास 

ऊसतोड मुकादमाचे तीन लाख रुपये केले लंपास 

परळी (बीड) : तालुक्यातील मालेवाडी तांडा येथील एका ऊसतोड मुकादमाचे मजुरांना वाटण्यासाठी बँकेतून काढलेले ३ लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. 

मोंढ्यातील एका सहकारी बँकेतून राजू सुखदेव राठोड या ऊसतोड मुकादमाने १.३० वाजेच्या सुमारास 3 लाख रुपये काढले. ही रक्कम ऊसतोड कामगारांना देण्यासाठी ते दुचाकीवरून गावाकडे निघाले. यावेळी एका दुचाकीवर अज्ञात दोघाजणांनी त्यांच्या पुढे जात पैसे खाली पडले आहेत असे म्हटले. राठोड यांनी मागे पाहताच त्यांच्या गाडीस लावलेली पैस्यांची पिशवी त्यांनी पळवली. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास शेळके ,डी बी पथक प्रमुख बाबासाहेब बांगर, माधव तोटेवाड,सुंदर केंद्रे, शंकर बुडडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. 
 

Web Title: Three lakh rupees looted in parali