मेटेंच्या स्वीय सहायकांकडून मुख्याधिकाऱ्यांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:09 AM2020-01-08T00:09:16+5:302020-01-08T00:10:41+5:30

बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना आ.विनायक मेटे यांचे स्वीय सहायक विनोद कवडे यांनी ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली.

Threats to the Chiefs from the Met's Acceptable Assistants | मेटेंच्या स्वीय सहायकांकडून मुख्याधिकाऱ्यांना धमकी

मेटेंच्या स्वीय सहायकांकडून मुख्याधिकाऱ्यांना धमकी

Next
ठळक मुद्देरस्ते कामांचा विषय : बोलता-बोलता काही त्रुटींवरून वाद

बीड : बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना आ.विनायक मेटे यांचे स्वीय सहायक विनोद कवडे यांनी ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी दुपारी बीड नगर पालिकेत घडला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस दप्तरी नोंद नव्हती.
मुख्याधिकारी दोरकुळकर हे मंगळवारी दुपारी कार्यालयीन कामकाज करीत होते. याचवेळी कवडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे आले. त्यांनी कागदपत्रांची माहिती मुख्याधिकाऱ्यांना विचारली. त्यांनीही दिली.
मात्र, बोलता बोलता काही त्रुटींवरून दोघांत शाब्दिक चकमक झाली. याचवेळी कवडे यांनी मुख्याधिका-यांना ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर मुख्याधिका-यांनाही राग अनावर झाला आणि ‘काय बघून घेतो’ असे म्हणत त्यांनीही प्रत्युत्तर दिले. मुख्याधिकाºयांच्या कक्षात गोंधळ झाल्याचे पाहून आरडाओरडा ऐकून पालिकेतील इतर कर्मचा-यांनी धाव घेतली.
त्यांनी दोघांचा वाद मिटविला. यामुळे पालिकेचे कामकाजही काही वेळ ठप्प झाले होते. कर्मचा-यांनी या घटनेचा निषेधही नोंदविला आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल नव्हती.
वादाचा व्हिडीओ व्हायरल
मुख्याधिकारी व स्वीय सहायकांच्या वादाचा व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे पालिका कर्मचा-यांनी झालेल्या प्रकाराचा निषेध नोंदवित संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. बुधवारी संघटना याबाबत जिल्हाधिकाºयांनाही भेटणार आहे.

बीडमधील रस्त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी आणला. दोन महिन्यांपासून योग्य ती कार्यवाही करून याचे टेंडर काढा म्हणून विनंती केली. रस्ते झाले तर नागरिकांनाच फायदा होणार आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच कार्यवाही केली जात नव्हती. याच कामासंदर्भात माझे स्वीय सहायकही भेटायला गेले होते. वाद झाला किंवा नाही, हे माहिती घेऊन सांगेन. -आ.विनायक मेटे, बीड

Web Title: Threats to the Chiefs from the Met's Acceptable Assistants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.