अंबाजोगाई : ज्याची ऐपत दहा पैशांची आहे त्याने कष्ट करून पंधरा पैसे करावेत, पण दहाचे शंभर करायला बघणाऱ्यांची जागा तुरुंगात आहे, हे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षांत दाखवून दिले आहे. त्यामुळे माझ्याकडे चुकीची कामे घेऊन येऊ नका, अशा कडक शब्दांत भाजपच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.
शनिवारी सायंकाळी अंबाजोगाईत भाजपच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, तर व्यासपीठावर गेवराईच्या नगराध्यक्षा गीता पवार, युवानेते अक्षय मुंदडा, युद्धजित पंडित, माधव निर्मळ, बाळासाहेब दोडतले आदी उपस्थित हाेते. मुंडे पुढे म्हणाल्या की, मी तुम्हाला दहा लाखांचे पत्र दिले तर त्यात नियमानुसार एक लाख कमवा; पण काम दर्जेदार करा. घराचे मजले कसे चढतात, हे घरच्यांनी आणि बापाने विचारायला हवे. चुकीच्या मार्गाने कमावले तर कारवाई आणि अटक अटळ आहे, हे लक्षात ठेवा.
कार्यालय कार्यकर्त्यांचा अड्डा नकोसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अंबाजोगाईत संपर्क कार्यालय सुरू केले. जिथे मुंडे साहेबांच्या राजकीय जीवनाची बीजे उगवली त्या शहरात मुद्दाम हे कार्यालय सुरू केले आहे. हे कार्यालय कार्यकर्त्यांचा अड्डा नको, तर सामान्य माणसाला मदत व न्याय मिळाला पाहिजे, हा या कार्यालयाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यांनी कारस्थान केले ते आज नकाशावरून गायब झालेकाही लोक आपल्याला सोडून गेले, तर काही लोक आपल्याला वापरून दुसऱ्यांशी संधान साधत गडबड करत आहेत. पण जो माझ्यासोबत कारस्थान करतो, तो कुठे असतो? माझ्या हृदयात पाप नाही, त्यामुळे माझ्या पाठीशी देवाचा आशीर्वाद आहे. राजकारणात जय-पराजय होतच असतो. मीदेखील पडले आहे. पण ज्यांनी हे (कारस्थान) केले ते आज नकाशावरून गायब झाले आहेत. मला काही करावे लागत नाही, निसर्गच योग्य वेळी काय करायचे ते ठरवतो, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.
Web Summary : Pankaja Munde warned workers against corruption, emphasizing integrity in dealings. She inaugurated a BJP office in Ambajogai, stressing public service. Munde highlighted that those who conspired against her have disappeared, urging renewed dedication.
Web Summary : पंकजा मुंडे ने कार्यकर्ताओं को भ्रष्टाचार के खिलाफ चेतावनी दी और व्यवहार में ईमानदारी पर जोर दिया। उन्होंने अंबाजोगई में भाजपा कार्यालय का उद्घाटन किया, जिसमें जनसेवा पर जोर दिया गया। मुंडे ने कहा कि उनके खिलाफ साजिश करने वाले गायब हो गए हैं, और फिर से समर्पण करने का आग्रह किया।