"२५ जानेवारीचे आंदोलन होणार, धनंजय मुंडे जातीय तेढ वाढवत..."; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:27 IST2025-01-06T18:26:40+5:302025-01-06T18:27:20+5:30
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बीड जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत, यावरुन आता जरांगे पाटील यांनी मंत्री मुंडे यांच्यावर टीका केली.

"२५ जानेवारीचे आंदोलन होणार, धनंजय मुंडे जातीय तेढ वाढवत..."; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षा देण्याची मागणी सुरू आहे. या मागणीसाठी राज्यभरात मूक मोर्चे सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी परभणी येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. या विधानाच्या निषेधार्थ आता ओबीसी समाजाकडून आंदोलन सुरू आहेत. जरांगे पाटील ंयांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुरू आहे. यावरुन आता मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली, कोणी सुपारी दिली होती? पोलिसांच्या चार्जशीटमधून मोठा खुलासा
'मंत्री धनंजय मुंडे राज्यात जातीयवाद करत आहेत, ते टोळ्या पाळत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. आमची लढाई आरक्षणाचीच आहे पण तुम्ही लोकं मारून टाकायला लागल्यानंतर बोलायचं नाही का? यात जातीचा संबंध आला कुठुन? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.
धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ही तत्परता धनंजय मुंडे आणि त्यांनी टोळ्या पाळल्या आहेत.लोकांच्या पोरांची हत्या करण्यासाठी, खंडणी वसुल करण्यासाठी. ही तत्परता त्यांनी त्यावेळी दाखवायला हवी होती. संतोष देशमुख यांचा मृतदेह दोन दिवस केज येथील रुग्णालयात पडून होता. त्यावेळी मस्साजोग गाव रस्त्यावर होते, त्यांनी तत्परता दाखवायला हवी होती. त्यांचे गुंड लोक देशमुख यांच्या भावाला धमक्या द्यायला लागले, तरीही आम्ही बोलायचं नाही का? असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
"धनंजय देशमुख आज न्यायासाठी फिरत आहे. त्यांना न्याय कधी मिळणार? आम्ही त्यांच्या न्यायासाठी बोलायचं नाही का? त्यांच्या जातीच्या लोकांना यांना न्याय मिळावा असं वाटत नाही का? या घटनेत जातीच काय आलं?, असंही जरांगे पाटील म्हणाले. धनंजय मुंडे राज्यात टोळ्या पाळत आहेत, जातीयवाद करत आहेत, असा आरोपही केला. मी गुंडांना बोललो, कुठल्या जातीला बोललो नाही, या प्रकरणात मराठा, ओबीसी संबंध येतो कुठे?, असंही जरांगे पाटील म्हणाले.
परळी, बीड, अंबाजोगाईनंतर धारूरमध्ये जरांगेंवर गुन्हा नोंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यात विविध ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी परभणी येथे निघालेल्या मोर्चानंतर उपस्थित जनतेला संबोधित करताना धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख करत व मराठा आणि वंजारा समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ भाषण मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केले. बीड जिल्ह्यातील वंजारा समाजसह ओबीसी समाजाने याचा निषेध नोंदवत मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी आक्रमक झाल्याचे पाहिला मिळत आहे. परळी येथील शिवाजीनगर पोलीसांत सात तास हे आंदोलन केल्यानंतर जरांगे यांच्या विरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल झाला होता. धारूर येथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.