भरधाव कारने बाईकला उडवले; भीषण अपघातात बाईकवरील दोघे जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 14:02 IST2022-03-19T14:02:01+5:302022-03-19T14:02:56+5:30
कार भरधाव वेगात होती. त्यात सातजण असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

भरधाव कारने बाईकला उडवले; भीषण अपघातात बाईकवरील दोघे जागीच ठार
माजलगाव (बीड) : माजलगाव-तेलगाव राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी फाट्यावर आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारचा आणि बाईकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघातात बाईकवरील दोघांचा मृत्यू झाला. लक्ष्मण भीमराव विघ्ने ( 60 ) व सिद्धेश्वर प्रल्हाद जाधव ( 35) अशी मृतांची नावे असून ते शिंदेवाडी येथील रहिवासी होते.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, आज सकाळी माजलगावकडून तेलगावकडे एक कार ( एम.एच.44 एस 3203) भरधाव वेगात जात होती. दरम्यान, शिंदेवाडी फाट्यावर चालकाचा ताबा सुटल्याने शिंदेवाडीकडून येणाऱ्या एका बाईकवर कार धडकली. यात बाईकवरील लक्ष्मण भीमराव विघ्ने व सिद्धेश्वर प्रल्हाद जाधव हे जागीच ठार झाले. भरधाव कार रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. तर बाईकचा चेंदामेंदा झाला आहे.
दरम्यान, कार भरधाव वेगात होती. त्यात सातजण असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यातील अनेक जण जखमी झाले आहेत. कारमधील प्रवास्यांची अद्याप ओळख पटली नाही.