देव कोंडला त्याला सोडवा...'; कुटुंबाच्या अनोख्या तक्रारीने पोलिसही झाले अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 11:51 IST2023-01-08T11:51:21+5:302023-01-08T11:51:35+5:30

कुटुंबाच्या अनोख्या तक्रारीने पोलिसही झाले अचंबित

The police were surprised by the unique complaint of the family in beed | देव कोंडला त्याला सोडवा...'; कुटुंबाच्या अनोख्या तक्रारीने पोलिसही झाले अचंबित

देव कोंडला त्याला सोडवा...'; कुटुंबाच्या अनोख्या तक्रारीने पोलिसही झाले अचंबित

बीड : ‘विठ्ठला शपथ’ या मराठी चित्रपटात ‘देव कोंडला’ हे गाणे आहे. या गीताला साजेसा प्रसंग शनिवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात अनुभवास आला. ‘देव कोंडला, त्याला सोडवा’, असे गाऱ्हाणे घेऊन केज तालुक्यातील एका कुटुंबाने ठिय्या दिला.  

चिंचोली माळी (ता. केज) येथील अच्युत डिगांबर पवार व त्यांचे कुटुंबीय चिमुकल्यांना सोबत घेऊन शनिवारी सायंकाळी पाच वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. पोलिस अधिकारी व अंमलदारांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता आमची चुलती मनाबाई बबन पवार हिने देव कोंडले असून, ते आम्हाला धार्मिक कार्यासाठी परत हवे आहेत, त्यासाठी पोलिसांची मदत हवी, अशी मागणी केली. 

नेमकी काय तक्रार...

अच्युत पवार व त्यांच्या चुलती मनाबाई पवार या दोन कुटुंबांत एकत्रित देवाच्या मूर्ती आहेत. त्या मनाबाईंकडे असून, घरात कुलूप लावून कोंडल्या आहेत. अच्युत पवार यांच्या कुटुंबातील एका लहान मुलाच्या बारशाच्या कार्यक्रमासाठी या मूर्ती हव्या आहेत; पण त्या देण्यास मनाबाई नकार देत आहेत. 

Web Title: The police were surprised by the unique complaint of the family in beed