खड्ड्याने घेतला शेतकऱ्याचा बळी; ट्रॅक्टर आदळ्यानंतर खाली कोसळून जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2023 15:16 IST2023-03-22T15:16:27+5:302023-03-22T15:16:48+5:30
आष्टी तालुक्यातील केरूळ येथील घटना

खड्ड्याने घेतला शेतकऱ्याचा बळी; ट्रॅक्टर आदळ्यानंतर खाली कोसळून जागीच मृत्यू
- नितीन कांबळे
कडा - अचानक खड्ड्यात ट्रॅक्टर आदळल्याने स्टेअरिंगवरील ताबा सुटून खाली पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना केरूळ येथे मंगळवारी सायंकाळी घडली आहे. अंबादास श्रीपती अनारसे ( ६७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील केरूळ येथील शेतकरी अंबादास श्रीपती अनारसे हे मशागतीसाठी शेतात ट्रॅक्टर घेऊन जात होते. दरम्यान, रस्त्यातील खड्ड्यात ट्रॅक्टर आदळल्याने स्टेअरिंगवरील ताबा सुटून अनारसे खाली फेकले गेले. यात गंभीर जखमी झालेल्या अनारसे यांचा जागीच मृत्यू झाला . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते माजी आमदार भीमराव धोंडे यांचे मेहुणे होत. शोकाकुल वातावरणात आज त्यसंस्कार करण्यात आले.