ट्रॅक्टर खड्ड्यात आदळल्याने चालक कॅबीनच्या बाहेर उडाला; रस्त्यावर कोसळून झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 13:51 IST2022-12-31T13:49:19+5:302022-12-31T13:51:14+5:30

रात्री १० वाजेच्या सुमारास खड्ड्यात ट्रॅक्टर आदळून चालक बाहेर फेकला गेला

The driver was thrown out of the cab when the tractor hit a ditch; Died after collapsing on the road | ट्रॅक्टर खड्ड्यात आदळल्याने चालक कॅबीनच्या बाहेर उडाला; रस्त्यावर कोसळून झाला मृत्यू

ट्रॅक्टर खड्ड्यात आदळल्याने चालक कॅबीनच्या बाहेर उडाला; रस्त्यावर कोसळून झाला मृत्यू

- नितीन कांबळे 
कडा (बीड) :
खड्ड्यात ट्रॅक्टर आदळल्याने कॅबीनमधून रोडवर फेकल्या गेलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिरापूर येथे घडली आहे. अक्षय भाऊसाहेब सांगळे ( रा.कडा) असे मृत तरूण चालकाचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील कडा येथील अक्षय भाऊसाहेब सांगळे ( २४ रा.कडा ) हा तरूण ट्रॅक्टर चालक आहे. तो शुक्रवारी रात्री शिरापूर येथून ट्रॅक्टर चालवत कड्याकडे येत होता. दरम्यान, शिरापूरजवळ रोडवरील एका खड्ड्यात टॅक्टर जोरात आदळले. यावेळी स्टेअरिंगवरील ताबा सुटून अक्षय कॅबीनबाहेर फेकला जाऊन रस्त्यावर कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

ग्रामस्थांकडून माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत पाहणी केली. पंचनामा करत मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. आज सकाळी शोकाकुल वातावरणात कडा येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अवैध वाळू वाहतूकीच्या बळीची चर्चा 
शिरापूर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून नदीपात्रातून अवैध वाळू उपासा केला जात आहे. रात्रीअपरात्री या मार्गावरून खुलेआम वाहतूक केली जाते. तसेच अक्षय हा याचा अवैध वाळू वाहतूकीचा बळी असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

Web Title: The driver was thrown out of the cab when the tractor hit a ditch; Died after collapsing on the road