गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला विवाहितेचा मृतदेह; खून झाल्याचा माहेरच्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:56 IST2022-08-01T16:56:10+5:302022-08-01T16:56:44+5:30
नरसिंह तांड्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला विवाहितेचा मृतदेह; खून झाल्याचा माहेरच्यांचा आरोप
गेवराई (बीड) : तालुक्यातील नरसिंह तांडा येथील एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत रविवार रोजी सायंकाळी आढळून आला. अंजना सुनिल राठोड असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी तिचा खून झाल्याचा आरोप केला असून सासरच्या मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नरसिंह तांडा गुळज येथे अंजना राठोड हिचा रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दरम्यान, माहेरच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी अंजनाची आत्महत्या नसून तिचा सासू , सासरे सासरच्या मंडळींनी खून केल्याचा आरोप केला. सासरच्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत नातेवाईकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी आणलेल्या उमापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती. माहिती मिळताच उमापूर येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.