रात्री जेवणानंतर घराबाहेर पडलेल्या तरुणाचा पहाटे आढळला मृतदेह; अंगावर आहेत अनेक जखमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 13:57 IST2023-04-06T13:56:36+5:302023-04-06T13:57:05+5:30
पोइतांडा येथील १९ वर्षीय तरूणाचा खून झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

रात्री जेवणानंतर घराबाहेर पडलेल्या तरुणाचा पहाटे आढळला मृतदेह; अंगावर आहेत अनेक जखमा
गेवराई (बीड) : तालुक्यातील तलवाडा जवळील पोईतांडा येथील एका १९ वर्षीय तरूण रात्री जेवण करून घराबाहेर पडला. त्याचा आज पहाटे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. रामेश्वर ज्ञानेश्वर राठोड असे मृताचे नाव आहे. दरम्यान, मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमा दिसत आहेत. मृताच्या नातेवाईकांनी हा खुनाचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.
रामेश्वर ज्ञानेश्वर राठोड हा उसतोड मजूर असून काही दिवसांपूर्वीच गावी परतला होता. बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जेवणानंतर तो घराबाहेर पडला. तर त्याचे आईवडील शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले. दरम्यान, आज पहाटे ५ वाजता तांड्यावरील सचिन लहु चव्हाण याने गंभीर जखमी अवस्थेतील रामेश्वरला शहरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून तो आधीच मृत असल्याचे सांगितले.
दरम्यान, मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश करत रामेश्वरचा खून झाल्याचा आरोप केला. तसेच गुन्हा दाखल केल्याशिवाय शवविच्छेदन होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. या प्रकरणी तलवाडा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर यांच्यासह कर्मचारी अधिक तपास करत आहेत.