भरधाव कारच्या धडकेत ऑटोरिक्षा खड्ड्यात जाऊन उलटला; चालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 20:28 IST2023-01-31T20:25:18+5:302023-01-31T20:28:19+5:30
केज-मांजरसुबा राष्ट्रीय महामार्गावर सारूळ शिवारात झाला अपघात

भरधाव कारच्या धडकेत ऑटोरिक्षा खड्ड्यात जाऊन उलटला; चालकाचा मृत्यू
- मधुकर सिरसट
केज (बीड): केज-मांजरसुबा राष्ट्रीय महामार्गावर सारूळ शिवारात आज सकाळी ९ .३० वाजेच्या सुमारास कार-ऑटोरिक्षाची जोरदार धडक झाली. धडकेनंतर ऑटोरिक्षा खड्ड्यात जाऊन उलटला. यात ऑटोरिक्षा चालकाचा मृत्यू झाला.
सारूळ येथील महेश बहादूर पुरी हे सकाळी ऑटोरिक्षा ( क्रमांक एम एच 23/ एच 9030 ) चालवत नांदूर फाट्याकडे जात होते. सारूळ शिवारात समोरून येणाऱ्या भरधाव कारने ( क्रमांक एम एच 25/ आर 7012 ) ऑटोरिक्षास जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की ऑटोरिक्षा बाजूच्या खड्यात जाऊन उलटला. यात ऑटोरिक्षा चालक महेश बहादूर पुरी ( 23 वर्षे, रा. सारूळ ) गंभीर जखमी झाला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नांदूरघाट पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार अभिमान भालेराव, जमादार अशोक मेसे, व रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून जखमीस बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून महेश पुरीस मृत घोषित केले. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.