ताबा सुटल्याने टेम्पो पुलावरून कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:20 IST2019-04-03T00:20:28+5:302019-04-03T00:20:52+5:30
मंगळवारी पहाटे साडेतीन-चार वाजण्याच्या सुमारास धामणगावकडून नगरकडे जात असलेल्या टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात चालक अंबादास गोल्हार जखमी झाला आहे.

ताबा सुटल्याने टेम्पो पुलावरून कोसळला
कडा : मंगळवारी पहाटे साडेतीन-चार वाजण्याच्या सुमारास धामणगावकडून नगरकडे जात असलेल्या टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात चालक अंबादास गोल्हार जखमी झाला आहे. याच टेम्पोला दोन वेगवेगळे नंबर असल्याने परिसरात उलट सुलट चर्चा होत आहे.
बीड-धामणगाव नगर राज्य महामार्ग वरील घाटापिंपरी येथील पुलाच्या अलिकडे गावाला पाणीपुरवठा करणारा (एमएच-०४/ एएल २०८) हा टँकर थांबलेला असताना कापशी येथून नगरकडे जात असलेल्या चालक अंबादास दिनकर गोल्हार (रा. कापशी ता.आष्टी) याचा ताबा सुटल्याने टँकरला धडक देऊन पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात चालक अंबादास गोल्हार हा जखमी झाला असल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. अंभोरा पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
एकाच टेम्पोला दोन क्र मांक कसे?
येथील पुलावरून खाली कोसळलेल्या टेम्पोला एमएच-१६ सीसी २५४४ व एमएच-१६ सीए-२५४५ हे दोनही क्र मांक असल्याने टेम्पो नेमक काय घेऊन गेला आणि काय नाही की चोरीचा असावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.