शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

महागाई भत्ता देण्याची शिक्षक परिषदेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST

कोरोनाचा धोका अंबाजोगाई : कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसत असली तरी कोरोना धोका टळलेला नाही. ...

कोरोनाचा धोका

अंबाजोगाई : कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसत असली तरी कोरोना धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. विनाकारण गर्दी करण्याचे टाळण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही अनेकजण विनाकारण गर्दी करत आहेत. प्रवास करत आहेत. त्यामुळे धोका वाढत आहे. याची प्रत्येकानेच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

कर्णकर्कश हॉर्नवर बंदीची मागणी

अंबाजोगाई : शहरातील विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी परिसरांत दुचाकी चारचाकी वाहनधारकांकडून वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवले जात आहेत. याचा नागरिकांना त्रास होत असून, वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

स्वच्छतागृहाचा अभाव

अंबाजोगाई: राष्ट्रीय महामार्गावर कित्येक किलोमीटर अंतरात सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांतील प्रवाशांची गैरसोय होत असते. यासाठी खासगी ढाबे किंवा महामार्गाकडेच्या पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाने योग्य नियोजन करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

विमा कवचाची प्रतीक्षा

अंबाजोगाई: कोरोनाच्या काळात मजुरांना रोजगारासाठी विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे.एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्याने जिथे काम मिळेल तिथे रोजगारासाठी जावे लागते, अशा स्थितीत कोरानाचा संसर्ग ओढवल्यास विमा कवच हवे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी केली आहे.