शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

तलवाडा पोलिसांनी छेड काढणा-या रोमिओंना केले जेरबंद; काल विद्यार्थिनीने केला होता आम्हत्येचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 7:12 PM

गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील एका विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या दोन रोड रोमिओंविरूद्ध  तलवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद झाला आहे. या दोघांना तात्काळ बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देगढी येथे महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असताना गावातीलच सचिन गाडे व दीपक गाडे या दोन रोडरोमिओंनी विद्यार्थिनीची छेड काढली होती. बदनामीच्या भीतीने सदरील विद्यार्थिनीने आजोबासाठी आणलेल्या दमा आजाराच्या तब्बल ३० गोळ्या गिळल्या होत्या.

बीड : गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील एका विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या दोन रोड रोमिओंविरूद्ध  तलवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद झाला आहे. या दोघांना तात्काळ बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. मुलीने दिलेल्या जवाबावरून वेगवेगळे गुन्हे नोंद झाले आहेत.

गढी येथे महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असताना गावातीलच सचिन गाडे व दीपक गाडे या दोन रोडरोमिओंनी विद्यार्थिनीची छेड काढली होती. तसेच कॉल रेकॉर्ड करून सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. बदनामीच्या भीतीने सदरील विद्यार्थिनीने आजोबासाठी आणलेल्या दमा आजाराच्या तब्बल ३० गोळ्या गिळल्या होत्या. यामुळे ती अत्यवस्थ झाली होती. तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या जवाबावरून सचिन व दीपक गाडे या दोघांविरूद्ध वेगवेगळे गुन्हे तलवाडा पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. 

दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी तात्काळ गावात जावून सचिन व दीपक गाडेला बेड्या ठोकल्या. सायंकाळी पाच वाजता त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू असल्याचे बांगर म्हणाले.

आणखी एका पथकाची स्थापनाजिल्हा, तालुका तसचे  प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत एका छेडछाडविरोधी पथकाची स्थापना केली आहे. परंतु हे पथके सध्या सुस्त असल्याने संताप व्यक्त होत आहे. तळवट बोरगावच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पथकांना कडक सुचना देत कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आणखी एका पथकाची नियुक्ती केली आहे. यामध्ये तीन पुरूष व तीन महिला पोलीस कर्मचारी असतील, असे श्रीधर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडArrestअटक