'बळीराजावरचे संकट दूर कर,कोरोना नाहीसा होऊ दे'; मुंडे भगिनींनी घातले योगेश्वरी देवीला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 14:14 IST2021-10-13T14:14:02+5:302021-10-13T14:14:35+5:30

पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी घेतले योगेश्वरी देवीचे दर्शन

'Take away the trouble of Baliraja, let Corona disappear'; Munde sisters at Yogeshwari Devi in Sakade | 'बळीराजावरचे संकट दूर कर,कोरोना नाहीसा होऊ दे'; मुंडे भगिनींनी घातले योगेश्वरी देवीला साकडे

'बळीराजावरचे संकट दूर कर,कोरोना नाहीसा होऊ दे'; मुंडे भगिनींनी घातले योगेश्वरी देवीला साकडे

अंबाजोगाई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी आज महाष्टमी निमित्त श्री योगेश्वरी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. अतिवृष्टीत बळीराजावर आलेले संकट दूर कर, कोरोना नाहीसा होऊ दे असे साकडे त्यांनी यावेळी देवीला  घातले. 

  नवरात्रोत्सव निमित्त पंकजा मुंडे व खा.डॉ.प्रितम मुंडे दरवर्षी परंपरेनुसार योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी शहरात आल्या होत्या. सकाळी भगवान बाबा चौकात कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले, त्यानंतर मंदिरात जाऊन त्यांनी  आदिशक्ती योगेश्वरी मातेची मनोभावे पूजाअर्चा केली आणि दर्शन घेतले. अन्नदात्या बळीराजाला सर्व संकटातून मुक्त कर आणि कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना आदिशक्ती चरणी केली.यावेळी आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, गयाताई कराड , भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे उपस्तीत होते.

Web Title: 'Take away the trouble of Baliraja, let Corona disappear'; Munde sisters at Yogeshwari Devi in Sakade