देसुर येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी पतीस घेतले ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 14:40 IST2019-09-06T14:37:43+5:302019-09-06T14:40:59+5:30

मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आला आहे.

Suspected death of woman at Desur; Police take husband into custody | देसुर येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी पतीस घेतले ताब्यात 

देसुर येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी पतीस घेतले ताब्यात 

ठळक मुद्देमहिलेच्या पतीने काही वर्षांपूर्वी दुसरा विवाह केला होता भावासोबत मृत्युच्या काही तासांपूर्वी बोलणे झाले

कडा (बीड ) : आष्टी तालुक्यातील देसूर येथील सुलभा सिताराम काळे (30)  या महिलेचा गुरुवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी हा मृत्यू संशयास्पद असून तिला जीवे मारण्यात आल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पोलिसांनी सुलभा यांचे पती सीताराम संभू काळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुलभा काळे आणि त्यांचे भाऊ संतोष भीमराव राहिंज यांचे गुरुवारी राञी १० वाजेच्या सुमारास फोनवर संभाषण झाले. मात्र, अचानक रात्री १२ वाजेच्या सुमारास सुलभा यांचे पती सीताराम यांनी संतोष यांना फोन करून सुलभा मृत झाल्याचे सांगितले. सिताराम काळे यांनी काही वर्षांपूर्वीच दुसरा विवाह केला आहे. त्यामुळे सुलभा यांचा सतत कौटुंबिक छळ होत असे. यामुळे सुलभा यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप संतोष यांनी केला आहे. 

पोलिसांनी सीताराम काळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच सुलभा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आला आहे. सुलभा यांना एक मुलगी दोन मुल आहेत. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Web Title: Suspected death of woman at Desur; Police take husband into custody