सुमित वाघमारे खून प्रकरण; आरोपींच्या नातेवाईकांनी साक्षीदाराला धमकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 16:19 IST2019-07-09T16:17:54+5:302019-07-09T16:19:36+5:30

न्यायालयाच्या परिसरातच आरोपींच्या नातेवाईकांनी धमकावले

Sumit Waghmare murder case; The relatives of the accused threatened the witness in Beed court | सुमित वाघमारे खून प्रकरण; आरोपींच्या नातेवाईकांनी साक्षीदाराला धमकावले

सुमित वाघमारे खून प्रकरण; आरोपींच्या नातेवाईकांनी साक्षीदाराला धमकावले

बीड : प्रेमविवाह केला म्हणून बीड शहरातील बार्शी नाका परिसरात १९ डिसेंबर २०१८ रोजी सुमित वाघमारे या तरुणाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून  न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी याप्रकरणातील सुमित वाघमारे याची पत्नी तसेच फिर्यादी व साक्षीदार भाग्यश्री ही न्यायालयात तारखेसाठी जात होती, त्यावेळी न्यायालयाच्या परिसरातच आरोपींच्या नातेवाईकांनी तिला धमकावले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

प्रेमविवाह केल्यामुळे सुमित वाघमारेचा खून झाला होता. यातील आरोपी संकेत वाघ याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी होती. याप्रकरणातील साक्षीदार सुमितची पत्नी भाग्यश्री वाघमारे हिला आरोपींच्या नातेवाईकांनी न्यायालयात आल्यानंतर धमकावून शिवीगाळ केली. याप्रकरणी भाग्यश्रीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींचे नातेवाईक रेखा लांडगे, स्वाती लांडगे व मोहिनी गायकवाड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Sumit Waghmare murder case; The relatives of the accused threatened the witness in Beed court