कारच्या धडकेत गंभीर जखमी ऊसतोड कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 16:26 IST2021-07-30T16:26:26+5:302021-07-30T16:26:56+5:30
वडवणी तालुक्यात एका धार्मिक कार्यक्रमाहून परताना झाला अपघात

कारच्या धडकेत गंभीर जखमी ऊसतोड कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
धारूर : तालुक्यातील जहागीरमोहा येथील उसतोड कामगार ज्ञानोबा बळीराम सिरसट (६५ ) गुरुवारी सायंकाळी वडवणी येथे कारने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले होते. बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
ज्ञानोबा बळीराम सिरसट हे गुरुवारी वडवणी तालूक्यातील म्हातारा म्हसोबा येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. पोखरी फाटा येथे परत येण्यासाठी वाहनाची वाट पाहत असताना त्यांना एका कारने ( एम. एच. 12 सि. आर. 6611 ) जोरदार धडक दिली. गंभीर जखमी शिरसट यांना उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर जहागिर मोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. धारुर पोलिस ठाण्यात सफाई काम करणारे चंद्रकांत सिरसट यांचे वडील होत.