मांजरसुंबा येथे राकाँचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:55 IST2018-06-24T00:53:34+5:302018-06-24T00:55:07+5:30
पोखरी, पिंपरनई गावक-यांवर अन्याय झाल्यानंतर या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणा-या शेतक-यांवर प्रचंड दबाव आणण्याचं काम शासन-प्रशासन व्यवस्थेने केलं. परंतु अशा स्थितीतही प्रशासनाचा दबाव झुगारून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेकडो गावकरी रस्त्यावर उतरले.

मांजरसुंबा येथे राकाँचा रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
मांजरसुंबा : पोखरी, पिंपरनई गावक-यांवर अन्याय झाल्यानंतर या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणा-या शेतक-यांवर प्रचंड दबाव आणण्याचं काम शासन-प्रशासन व्यवस्थेने केलं. परंतु अशा स्थितीतही प्रशासनाचा दबाव झुगारून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेकडो गावकरी रस्त्यावर उतरले.
पोखरीसह बालाघाटावरील शेतकºयांच्या मागण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने माजी आ. सय्यद सलीम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय महामार्गावर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मांजरसुंबा येथे तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मांजरसुंबा चौकात व महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
पोखरी येथील गावकºयांच्या विद्युत पंपासह पाईपलाईनची मोडतोड करणाºया भायाळ येथील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केली.
आंदोलनात डी.बी. बागल, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते, तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, दिलीप भोसले, शेतकरी नेते भाऊसाहेब डावकर, मधुकर उबाळे, शाम तुपे, पी.वाय. जोगदंड, रमेश चव्हाण, फारुक पटेल, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, पं.स. सदस्य अनिल जाधव, बाळासाहेब गुजर, किशोर पिंगळे, फेरोज पठाण, पंजाब वाघमारे, पंडीत आरबाने, रवी तावरे, झुंजार धांडे, भैय्या मोरे, नंदकुमार कुटे, हनुमंत वाघमारे, के.व्ही. चव्हाण, विशाल घाडगेसह शेकडो शेतकºयांची यावेळी उपस्थिती होती.