शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तालुक्यात दरोडेखोरांची पोलिसांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:43 IST

आष्टी तालुक्यातील कानडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक झाली. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तरीही प्रतिकार करीत एका कुख्यात दरोडेखोरास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून इतर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

ठळक मुद्देतीन कर्मचारी जखमी : एक कुख्यात दरोडेखोर जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : तालुक्यातील कानडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक झाली. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तरीही प्रतिकार करीत एका कुख्यात दरोडेखोरास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून इतर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

आष्टी तालुक्यातील कानडी शिवारातील बंधाºयाच्या बाजूस नदीपात्राजवळ आटल्या ईश्वर भोसले, सचिन ईश्वर भोसले, सोन्या व त्यांच्यासोबत इतर काहीजण मोटारसायकलवरून दरोड्याच्या तयारीने येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना रविवारी रात्री मिळाली होती.

सदर माहितीच्या आधारे आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.सय्यद, उपनिरीक्षक मुबारक शेख, पोलीस कर्मचारी गायकवाड, शिकेतोड, लोहार, दराडे, पिंपळे, पठाण, गुजर, काळे, गडकर, केदार, क्षीरसागर, शेख, कळसाने असे १५ जणांच्या पथकाने तत्काळ कानडी शिवाराकडे धाव घेत दोन वेगवेगळी पथके करून सापळा लावला. रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास दोन मोटारसायकल काही अज्ञात लोक हेडलाईट चालू बंद करत कानडी शिवाराकडे येत असल्याचे दिसून आले. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली असता मोटारसायकल चालकाने पोलीस कर्मचारी लोहार, पठाण आणि शिकेतोड यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, यात पठाण आणि शिकेतोड हे कर्मचारी जखमी झाले. यावेळी गुजर आणि कळसाने यांनी दुचाकीवरील एकास पकडले तर दुसरा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

दुस-या मोटारसायकलचा पाठलाग करणाºया पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली आणि दुचाकीस्वार दोघे दरोडेखोर पळून गेले. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी पिंपळे जखमी झाले. जखमी पोलीस कर्मचा-यांवर आष्टी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.औरंगाबाद व सोलापूर ग्रामीणमध्ये वाँटेडसचिन ईश्वर भोसले (रा. वाहीरा) असे पकडण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. औरंगाबाद ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण मधील अनेक गुन्ह्यात तो ‘वाँटेड’ आहे. त्याच्याकडून एक चॉपर आणि मोटारसायकल (एमएच १६ बीएक्स ४७८७) जप्त करण्यात आली आहे. आटल्या ईश्वर भोसले, ईश्वर भोसले आणि अन्य एक पळून जाण्यात यशस्वी झाले.

सचिनला तीन दिवसांची पोलीस कोठडीपोलिसांनी ताब्यात घेतलेला कुख्यात दरोडेखोर सचिन भोसले याला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्या. धेंड यांनी त्याला १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.