गेवराईजवळ भरधाव कार विद्युत रोहीत्राला धडकली; चार प्रवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:34 IST2020-03-18T12:27:08+5:302020-03-18T12:34:49+5:30

तांदळा येथील गवते वस्तीवर हा अपघात घडला असून मृतांची ओळख अद्याप पटली नाही.

speedy car hit electric DP near Gavrai; The death of four travelers | गेवराईजवळ भरधाव कार विद्युत रोहीत्राला धडकली; चार प्रवाशांचा मृत्यू

गेवराईजवळ भरधाव कार विद्युत रोहीत्राला धडकली; चार प्रवाशांचा मृत्यू

ठळक मुद्देचारमधील दोघे जागीच ठार झाले दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

गेवराई ( बीड ) : भरधाव वेगातील कार विजेच्या रोहित्राला धडकून झालेल्या अपघातात चार जण ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील तांदळा येथील गवते वस्तीवर हा अपघात घडला असून मृतांची ओळख अद्याप पटली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास गवते वस्तीवरील नागरिक एका मोठ्या आवाजाने जागे झाले. नागरिकांनी आवाजाच्या दिशेन धाव घेतली, यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत रोहीत्राला एक कार ( एमएच २४ - व्ही- ९९९९ ) धडकल्याचे भीषण चित्र समोर दिसले. कार रोहीत्राला धडकून विद्युत खांब त्यावर कोसळले होते. यामुळे कार पूर्णपणे त्यात दबळी होती. नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरु केले. यावेळी कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर इतर दोघे कारच्या सांगाड्यात गुंतून गंभीर जखमी होते. 

नागरिकांनी जखमींना गाडीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान दोन्ही जखमींचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच चकलांबा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंजुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर रोहित्राखाली दबलेल्या दोघांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी बाहेर काढले. दरम्यान, चारही मृतांची अद्याप ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: speedy car hit electric DP near Gavrai; The death of four travelers