शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
6
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
7
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
8
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
9
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
10
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
11
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
12
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
13
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
14
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
15
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
16
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
17
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
18
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
19
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदा तालुक्यात यंदा सोयाबीन, तुरीचे क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST

कापूस, बाजरीचे क्षेत्र घटणार पाटोदा : अत्यल्प सिंचन क्षेत्र व डोंगराळ भूभाग असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदा चांगल्या पावसाची ...

कापूस, बाजरीचे क्षेत्र घटणार

पाटोदा : अत्यल्प सिंचन क्षेत्र व डोंगराळ भूभाग असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदा चांगल्या पावसाची शक्यता असल्याने खरिपाची पेरणी ५८ हजार हेक्टरपेक्षा जास्त होण्याची शक्यता असून, यंदा खरीप हंगामात सोयाबीन व तुरीच्या पेरणी क्षेत्रात वाढ होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

बीड जिल्ह्यात पाटोदा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. ८१ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र असलेल्या पाटोदा तालुक्यात खरीप हंगामात ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. गेल्या खरीप हंगामात झालेला समाधानकारक पाऊस व यंदाही हवामान खात्याने चांगला पाऊस होण्याची वर्तविलेली शक्यता लक्षात घेता यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.

अत्यल्प सिंचन क्षेत्र असलेल्या पाटोदा तालुक्यात खरीप हंगामात बाजरी हे महत्त्वाचे पीक होते; मात्र तालुक्यात सिंचन तलाव, पाझर तलाव व साठवण तलावांची संख्या गेल्या १०-१५ वर्षांत वाढल्याने बाजरीची जागा सोयाबीन या नगदी पिकाने घेतली आहे. गेल्या खरीप हंगामात तालुक्यात २८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात दोन ते तीन हजार हेक्टर वाढ होणार आहे.

खरीप हंगामात तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी, मूग व उडीद या पिकांची पेरणी केली जाते. यंदा कापूस या पिकाचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन व तुरीचे क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकाची परिस्थिती समाधानकारक राहिली. त्यामुळे तलावातील पाणीसाठे चांगले राहिल्याने पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला नाही. यंदा पावसाचे पाणी या तलावात येईपर्यंत सध्याचे पाणी पिण्यासाठी पुरणार आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे घरातील वापरावे; मात्र या बियाणांची उगवण क्षमतेची चाचणी करावी. बियाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

- गांगुर्डे,

तालुका कृषी अधिकारी पाटोदा.