केज (जि. बीड): तालुक्यातील जीवाचीवाडी ते तुकुचीवाडी या रस्त्यावरून सोमवारी मध्यरात्री अवैध डिझेल आणि विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या कारवर पोलिसांनी छापा टाकला. केज पोलीस उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या धाडीत ४ लाख २२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाहन चालक अनंत चौरे (रा. जीवाचीवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
निवडणूक आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मध्यरात्रीची गुपिते उघड; कारमध्ये काय आढळले?मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एम एच १२ / के वाय २१४८ या क्रमांकाच्या कारमधून साहित्याची तस्करी होत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचला. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कारची झडती घेतली असता, त्यात ११ हजार ५०० रुपये किमतीचे १२५ लिटर अवैध डिझेल आणि १० हजार ९५० रुपये किमतीचे 'बॉबी' ब्रँडच्या देशी दारूचे ३०० बाटल्यांचे ३ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी कारसह हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस पथकाची धडाकेबाज कामगिरीही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, अमिरोद्दीन इनामदार, जावेद कराडकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली. जमादार बालासाहेब डापकर यांच्या फिर्यादीवरून अनंत चौरे याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात अवैध डिझेल साठा आणि विनापरवाना दारू विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा इशारा: अवैध धंदे खपवून घेणार नाहीपोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तालुक्यात अशा प्रकारे छुप्या मार्गाने होणारी इंधन आणि दारूची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांचे गस्त पथक आता अधिक सतर्क झाले आहे. नागरिकांनी अशा अवैध प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Web Summary : Kej police seized illegal diesel and liquor worth ₹4.22 lakhs from a car near Jiwachiwadi, arresting driver Anant Choure. The raid, prompted by a tip, uncovered 125 liters of diesel and 300 bottles of liquor. Police intensify crackdowns before elections.
Web Summary : केज पुलिस ने जीवाचीवाड़ी के पास एक कार से 4.22 लाख रुपये का अवैध डीजल और शराब जब्त किया, चालक अनंत चौरे को गिरफ्तार किया। सूचना पर की गई छापेमारी में 125 लीटर डीजल और 300 बोतल शराब बरामद हुई। चुनाव से पहले पुलिस की कार्रवाई तेज।