शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

सहा महिन्यांच्या मुलीची आईनेच केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:11 AM

११ मार्च रोजी तळणेवाडी (ता. गेवराई) शिवारात पाण्याच्या कॅनॉलमध्ये सहा महिन्याच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

ठळक मुद्देअनैतिक संबंधातून मुलीचा जन्म : कॅनॉलमध्ये दिले फेकून; गेवराई पोलिसांचा तपास

बीड : ११ मार्च रोजी तळणेवाडी (ता. गेवराई) शिवारात पाण्याच्या कॅनॉलमध्ये सहा महिन्याच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रविवारी या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला असून, मुलीच्या हत्येप्रकरणी तिच्या आईला ताब्यात घेण्यात आले आहे.गेवराई तालुक्यातील तळणेवाडी शिवारात कॅनॉलच्या पाण्यात सहा महिन्याच्या मुलीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मनोज अजमेरा यांनी पोलिसांना दिली होती. त्यावरुन पोउपनि टाकसाळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच फोटो काढून परिसरातील गावांमध्ये शोधाशोध केली.दरम्यान, टाकसाळ यांच्या तक्रारीवरुन गेवराई ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि पुरुषोत्तम चोबे यांनी सहकाºयांसह गुन्ह्यातील आरोपीचा व नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी कॅनॉलच्या बाजूस असलेल्या जालना, बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील गावांची तपासणी केली. या दरम्यान एका गावात मयत मुलीच्या आईचा शोध लागला. यावेळी तिला विश्वासात घेऊन मपोउपनि मनीषा जोगदंड यांनी विचारपूस केली असता, अनैतिक संबंधातून मुलगी जन्मली असल्यामुळे त्या मुलीस वाहत्या पाण्याच्या कॅनॉलमध्ये टाकून ठार मारल्याची कबुली मुलीच्या आईने दिली. याप्रकरणी तपासी अंमलदार संदीप काळे यांनी १४ मार्च रोजी मुलीच्या आईस अटक केली. तिला न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पुरुषोत्तम चोबे, सपोनि संदीप काळे, पोउपनि युवराज टाकसाळ, पो. कर्मचारी नवनाथ गोरे, एकनाथ कावळे, ज्योती साळुंके, चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि देशमुख, पोहेकाँ बाळासाहेब सिरसाट, पोकाँ महेश रुईकर यांनी केली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीMurderखून