Walmik Karad :'SIT'चे बसवराज तेली आष्टीचे जावई, सुरेश धसांनी जवळचे अधिकारी आणले'; वाल्मीक कराडच्या पत्नीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 21:26 IST2025-01-14T21:24:31+5:302025-01-14T21:26:54+5:30

Walmik Karad : नवीन एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई असून ते सुरेश धस यांच्या जवळचे आहेत, असा दावा वाल्मीक कराड यांच्या पत्नीने केला.

SIT's Basavaraj Teli Ashti's son-in-law, Suresh Dhas brought close officials walmik Karad's wife makes a big claim | Walmik Karad :'SIT'चे बसवराज तेली आष्टीचे जावई, सुरेश धसांनी जवळचे अधिकारी आणले'; वाल्मीक कराडच्या पत्नीचा आरोप

Walmik Karad :'SIT'चे बसवराज तेली आष्टीचे जावई, सुरेश धसांनी जवळचे अधिकारी आणले'; वाल्मीक कराडच्या पत्नीचा आरोप

Walmik Karad ( Marathi News ) :  वाल्मीक कराड याची आज पोलीस कोठडी संपली. आज कोर्टात कराड याला हजर केले, कोर्टाने वाल्मीक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर कराड याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. या विरोधात आज कराड समर्थक आक्रमक झाले होते, यावेळी वाल्मीक कराड याच्या पत्नीने आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले. 

धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं?

वाल्मीक कराड याची पत्नी मंजिली कराड यांनी आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाल्मीक कराड याच्यावर लावण्यात आलेला मकोका हा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलाअसून देशमुख हत्येशी संबंध नसल्याचा दावा करण्यात आला. बजरंग सोनवणे यांनी आपल्या पतीला जीव मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोपही त्यांनी केला. नवीन एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई असून ते सुरेश धस यांच्या जवळचे असल्याचा दावाही त्यांनी केला. 

या सर्वांनी मिळून अल्पसंख्यांक असलेल्या वंजारी समाजाच्या दोन्ही मंत्र्यांना संपवण्यासाठी वाल्मिक कराड यांना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप मंजिली कराड यांनी केला. आज परळीमध्ये वाल्मीक कराड समर्थकांनी आंदोलन केले. पोलिस ठाण्यासमोर कराड याची मातोश्री उपस्थित होत्या, यावेळी त्यांची तब्येत बिघडली. 

यावेळी बोलताना मंजिली कराड म्हणाल्या, ही घटना घडली तेव्हा वाल्मीक कराड परळीत नव्हते. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, बजरंग सोनवणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. बजरंग जोनवणे यांना निवडून आणण्यासाठी माझ्या पतीने मदत केली, असंही मंजिली कराड म्हणाल्या.  

आठ आरोपींना मकोका

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आठ आऱोपींवर मकोका कायद्यांतर्गत यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यावेळी कराड याला या गुन्ह्यात घेण्यात आले नव्हतं. त्यानंतर दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वाल्मीक कराड हाच गुन्ह्याचा सूत्रधार असून त्याच्यावर मकोका कायद्यासह हत्येच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांकडून कराडवर मकोका लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Web Title: SIT's Basavaraj Teli Ashti's son-in-law, Suresh Dhas brought close officials walmik Karad's wife makes a big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.