मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात गावकऱ्यांचे टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 13:52 IST2019-02-11T13:41:10+5:302019-02-11T13:52:03+5:30
सरपंचाने गावात रहावे व ग्रामसेवकाची नियुक्ती करावी अशा प्रमुख मागण्या करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात गावकऱ्यांचे टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन
माजलगाव (बीड): तालुक्यातील मौजे मंजरथ ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांनी येथील मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन केले. सरपंचाने गावात रहावे व ग्रामसेवकाची नियुक्ती करावी अशा प्रमुख मागण्या करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मंजरथ येथील सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या बाहेर राज्यात नोकरी करत असून ग्रामपंचायतीकडे त्यांचे लक्ष नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीला ग्रामसेवक ही नाही. यामुळे ग्रामस्थांची कामे खोळंबली आहेत. याविरोधात गावकऱ्यांच्या वतीने सतत उपोषणे, आंदोलने करण्यात आली. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज येथील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
यावेळी सरपंचाने गावात रहावे, ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, रमाई, पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे करा, गावातील स्वच्छता करा, गावाचा पाणी पुरवठा व्यवस्थित करा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. आंदोलनात यावेळी ज्ञानेश्वर वाघमारे, भीमराव कदम, अगवान, राजरत्न डोंगरे, दत्ता वाघमारे, राजेश वाघमारे, तुकाराम चोरमले, संदिपान डोंबाळे, तात्या भाऊ थोरात आदींचा सहभाग आहे.
पहा व्हिडिओ :