धक्कादायक; केजच्या महिलेचा कोरोनामुळे औरंगाबादमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 11:52 IST2020-06-16T11:51:38+5:302020-06-16T11:52:15+5:30

माळेगाव येथील 60 वर्षीय महिलेचे मागील महिन्यात किडनी ट्रान्सप्लांट औरंगाबाद मध्ये झाले होते.

Shocking; Kaij's women dies in Aurangabad due to corona | धक्कादायक; केजच्या महिलेचा कोरोनामुळे औरंगाबादमध्ये मृत्यू

धक्कादायक; केजच्या महिलेचा कोरोनामुळे औरंगाबादमध्ये मृत्यू

बीड : केज तालुक्यातील माळेगाव येथील वृद्ध महिला औरंगाबाद मध्ये कोरोना पॉझिटिव्ह अली होती. आज तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

माळेगाव येथील 60 वर्षीय महिलेचे मागील महिन्यात किडनी ट्रान्सप्लांट औरंगाबाद मध्ये झाले होते. त्यांनतर 3 जून रोजी तिला रुग्णालयातुन सुट्टी देऊन घरी पाठवले. परंतु घरी आल्यावर त्रास सुरू झाल्याने केज मधीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस ऍडमिट करूनही फरक न जानवल्याने तिला पुन्हा 10 जून रोजी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिचा स्वॅब घेतला असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांनतर तिचा आज सकाळी मृत्यू झाला. 

दरम्यान, या रुग्णाची नोंद अद्यापही बीड जिल्हा आरोग्य विभागात झालेली नाही. पोर्टलवर नोंद नसल्याने हा मृत्यू अद्याप तरी जिल्ह्यात गणला गेला नाही. त्यामुळे जिल्ह्याची एकूण बाधित रुग्णाची संख्या 90 असून पैकी दोघांचा मृत्यू झालेला आहे. 64 कोरोनामुक्त झाले असून 24 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

Web Title: Shocking; Kaij's women dies in Aurangabad due to corona