शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

धक्कादायक ! वाहनाच्या धडकेत माॅर्निंग वाॅकला गेलेल्या व्यक्तीच्या शरीराचे झाले दोन तुकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 6:11 PM

Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत माॅर्निंग वाॅकला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू

ठळक मुद्देअपघातानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला.

अंबाजोगाई : पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी (दि.३१) पहाटे अंबाजोगाई-साखर कारखाना मार्गावर झाला. हा अपघात एवढा भीषण होता की त्या व्यक्तीचे कंबरेपासून दोन तुकडे झाले आहेत. दत्ता लक्ष्मण ठोंबरे (वय ४२, रा. टिळक नगर, अंबाजोगाई) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. टिळक नगर भागात त्यांची पिठाची गिरणी आहे. गुरूवारी पहाटे पाच वाजता दत्ता ठोंबरे नित्यनेमाप्रणाने माॅर्निंग वाॅकला गेले होते. अंबाजोगाई-साखर कारखाना रोडवर आरटीओ कार्यलाय वळणाच्या १०० मी. अलीकडे त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दत्ता ठोंबरे यांच्या शरीराचे कंबरेपासून दोन तुकडे झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला. या मार्गावर माॅर्निंग वाॅक करणाऱ्या लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. सहा. फौजदार सोनेराव बोडखे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूBeedबीड