शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

धक्कादायक! माजलगावच्या धरणात डॉक्टरच्या शोधार्थ गेलेला जवान गायब, दोघांचाही शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 1:31 PM

बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. ते स्वतः बोटच्या माध्यमातून धरणाच्या पाण्यात शोधकार्यात सहभागी झाले आहेत. 

- पुरूषोत्तम करवामाजलगाव (बीड): तालुक्यातील बेलोरा येथील डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ ( ४५)  हे रविवारी सकाळी ८ वाजता माजलगाव धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह २४ तास उलटूनही सापडला नाही. दरम्यान, डॉक्टरच्या शोधार्थ पाण्यात उतरलेला केडीआरएफचा एक जवान तीन तासांपासून गायब आहे. 

तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचे तेलगाव येथे त्यांचे खाजगी हॉस्पिटल आहे. ते गेल्या काही दिवसांपासून माजलगाव येथे वास्तव्यात होते. रोज सकाळी माजलगाव धरणामध्ये पोहायला जात. दररोजच्याप्रमाणे रविवारी सकाळी ते पोहायला गेले असताना दम लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

मच्छीमार, परळी व बीड येथील पथकाने त्यांना सापडण्याचा प्रयत्न केला. रविवारी डॉक्टरचा शोध लावू शकला नव्हता. त्यामुळे सोमवारी सकाळी कोल्हापूर येथील केडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. हे पथक पाण्यातून शोधाकार्य करत आहे. दरम्यान, या पथकातील राजू मोरे हा जवान मागील तीन तासांपासून पाण्यात गायब आहे. धरणाच्या पाण्यातून बाहेर आला नसल्याने आता डॉक्टरसोबत जवानाचा देखील शोध सुरु आहे. आज सकाळी बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. ते स्वतः बोटच्या माध्यमातून धरणाच्या पाण्यात शोधकार्यात सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरण