गेवराई तहसीलवर शिवसेनेचा महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:14 IST2018-09-12T00:13:50+5:302018-09-12T00:14:34+5:30

गेवराई तहसीलवर शिवसेनेचा महामोर्चा
गेवराई : गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर शेतकरी हक्क महामोर्चा धडकला.
उसाचे एफआरपी प्रमाणे जयभवानी आणि महेश साखर कारखान्याने तात्काळ शेतकºयांना पेमेंट द्यावे, दुष्काळ जाहीर करावा, नाफेडला दिलेल्या तुरीचे पैसे द्यावेत इ. मागण्यांसाठी हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी सभा झाली.
माजी मंत्री बदामराव पंडित, जि.प.सभापती युधाजित पंडित, पं.स. सभापती अभयसिंह पंडित, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, अजय दाभाडे, रोहित पंडित, भीष्माचार्य दाभाडे, उज्ज्वला वोभळे, विजयकुमार वाव्हळ, बप्पासाहेब तळेकर, अमोल करांडे, शिनू बेदरे आदींसह शेकडो शेतकरी बैलगाडीसह मोर्चात सहभागी झाले होते.