शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

अंबाजोगाई : कष्टकरी, गोरगरिबांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असते. यापुढे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही कार्य करणार ...

अंबाजोगाई : कष्टकरी, गोरगरिबांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असते. यापुढे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही कार्य करणार असून, कामगारांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले.

शिवसेना व पुत्रेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या इमारत कामगार मंडळांतर्गत कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, दत्तात्रय अंबेकर, शिवसेना जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, डॉ. गोपाळ चौसाळकर, तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, जिल्हा सहसंघटक अशोक गाढवे, शहर प्रमुख तथा संस्थेचे अध्यक्ष गजानन मुडेगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी आप्पासाहेब जाधव म्हणाले की, शिवसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्या सोडविण्यासाठी आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न करणार असून, यापुढे ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत सामाजिक कार्य शिवसैनिकांच्या हाताने घडावे. कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोंदणीकृत कामगारांना पाच हजार, दीड हजार अशी आर्थिक मदत दिली आहे. अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून आगामी काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सर्व कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे. यास सहकार्य केले जाईल, असे सांगून आपल्या स्वाराती रुग्णालयात सर्व प्रकारची सोय उपलब्ध आहेत, याचा कामगारांनी लाभ घ्यावा, असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिवसेना शहरप्रमुख तथा संस्थेचे अध्यक्ष गजानन मुडेगावकर यांनी कामगारांसाठी करत असलेल्या कार्याचा माहिती देऊन यातील विविध योजना काय आहेत हे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वैभव कुलकर्णी यांनी, तर आभार विजय मोरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर समन्वयक अर्जुन जाधव, उपशहरप्रमुख गणेश जाधव, शिवकांत कदम, अशोक दळवे, रवी मुडेगावकर, विशाल कुलकर्णी, राजेभाऊ पटाईत, श्रीधर सोमण, दिगंबर पांचाळ, बाळू धर्माधिकारी, अरुण यादव, संतोष जाधव आदींनी परिश्रम घेतले.

240721\3850img-20210724-wa0096.jpg~240721\3850img-20210724-wa0096.jpg

अंबाजोगाई येथे शिवसेनेच्या वतीने कामगारांना साहित्याचे वाटप~अंबाजोगाई येथे शिवसेनेच्या वतीने कामगारांना साहित्याचे वाटप