कार-दुचाकी अपघातात शिंदेसेनेचे तालुका उप प्रमुख चंद्रकांत इंगळे यांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 21:05 IST2026-02-01T21:05:15+5:302026-02-01T21:05:28+5:30

10 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातातच भावाचा मृत्यू!

Shinde Sena's taluka deputy chief dies on the spot in car-bike accident | कार-दुचाकी अपघातात शिंदेसेनेचे तालुका उप प्रमुख चंद्रकांत इंगळे यांचा जागीच मृत्यू

कार-दुचाकी अपघातात शिंदेसेनेचे तालुका उप प्रमुख चंद्रकांत इंगळे यांचा जागीच मृत्यू

केज: अहमदनगर - अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ढाकेफळ शिवारातील हॉटेल कारभारीसमोर झालेल्या कार व दुचाकी अपघातात शिंदे सेनेचे तालुका उप प्रमुख चंद्रकांत शहाजी इंगळे (वय 50 वर्षे रा. सादोळा) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघातात रविवारी सायंकाळी  6 वाजण्याच्या दरम्यान ढाकेफळ शिवारात घडला.

चंद्रकांत शहाजी इंगळे हे केज तालुक्यातील पिसेगाव येथे दोन दिवस चालणाऱ्या रेणुकादेवीच्या यात्रेच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी आले होते. तेथून ते दुचाकी क्रमांक (एम एच 44 / ए सी 6931) वरून सादोळा या आपल्या गावी जात होते. दरम्यान अंबाजोगाई येथून अहिल्यानगरकडे जाणारी कार क्रमांक (एम एच 16 / डी सी 8847) ची त्यांच्या दुचाकीला ढाकेफळ शिवारातील कारभारी हॉटेल समोर धडक लागून झालेल्या अपघातात चंद्रकांत शहाजी इंगळे जागीच ठार झाले.

अपघातात घडल्यानंतर चंद्रकांत इंगळे यांचे पार्थिव केज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉ. निवृत्ती मुंडे यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. चंद्रकांत इंगळे यांच्या पश्च्यात पत्नी, 2 मुले, भावजई, व 2 पुतणे असा परिवार आहे. 10 वर्षांपूर्वी झालेल्या दुचाकीच्या अपघातातच त्यांचा भाऊ शिवशंकर शहाजी इंगळे यांचा मृत्यू झाला होता. आज चंद्रकांत इंगळे यांचाही अपघातातच मृत्यू झाला.

Web Title : केज के पास कार-बाइक दुर्घटना में शिंदे सेना नेता की मौत

Web Summary : शिंदे सेना के केज तालुका उप प्रमुख चंद्रकांत इंगले की ढाकेफल के पास कार-बाइक टक्कर में मौत हो गई। दुर्घटना रविवार शाम को हुई जब इंगले रेणुका देवी की यात्रा से लौट रहे थे। मौके पर ही उनकी मौत हो गई। एक कार ने उनकी बाइक को टक्कर मार दी।

Web Title : Shinde Sena Leader Dies in Car-Bike Accident Near Kej

Web Summary : Chandrakant Ingale, Shinde Sena's Kej deputy leader, died in a car-bike collision near Dhakephal. The accident occurred Sunday evening while Ingale was returning from Renuka Devi's Yatra. He died on the spot. A car hit his bike.