अज्ञात वाहनाच्या धडकेत शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा. श्रीहरी काळे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 22:02 IST2025-02-03T22:02:00+5:302025-02-03T22:02:54+5:30

चहा घ्यायला खरात आडगाव फाट्यावर थांबले, अज्ञानत वाहनाने उडवले.

Sharad Pawar group's regional secretary Shrihari Kale died on the spot after being hit by an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा. श्रीहरी काळे जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा. श्रीहरी काळे जागीच ठार

माजलगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेश सचिव प्राध्यापक श्रीहरी शिवाजीराव काळे(वय ४७ वर्ष)यांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जाहीर मृत्यू झाला.ही घटना सोमवार  रोजी राष्ट्रीय महामार्गावर खरात आडगाव फाटा येथे रात्री ८ वाजता घडली.

श्रीहरी काळे नातेवाईकाच्या लग्न समारंभास सकाळी मोटारसायकलवरून परभणीला गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.भगवान सरवदे होते. सायंकाळी लग्नकार्य उरकून ते परभणीकडून माजलगावकडे राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टणम वरून येत होते. माजलगाव शहरापासून १० किमी अंतरावर असणाऱ्या खरात आडगाव फाटा येथे चहापाणी घेण्यासाठी त्यांनी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान गाडी थांबवली.

यावेळी त्यांच्या सोबत असणारे डॉ.सरवदे हे दुचाकीच्या एका बाजूने उतरले. तर दुसऱ्या बाजूने श्रीहरी काळे उतरत होते. याच दरम्यान भरधाव वेगात असणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनाने काळे यांना जोराची धडक दिली. तर दुसऱ्या बाजूने दुचाकीवरून उतरणारे डॉ.सरवदे हे सुखरूप बचावले. अपघातानंतर स्थानिकांनी काळे यांना तात्काळ माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषित करण्यात आले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सक्रिय कार्यकर्ते असलेले श्रीहरी काळे यांच्या निधनाने माजलगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अपघातानंतर धडक देणारे वाहन पसार झाले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 
 

Web Title: Sharad Pawar group's regional secretary Shrihari Kale died on the spot after being hit by an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.