अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला सात वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 07:10 IST2018-06-21T07:10:00+5:302018-06-21T07:10:00+5:30

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोखरी येथील अख्तर शेख इब्राहिम यास सात वर्षे कारावासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

Seven years imprisonment for sexual assault on minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला सात वर्षे कारावास

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी एकाला सात वर्षे कारावास

बीड : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोखरी येथील अख्तर शेख इब्राहिम यास सात वर्षे कारावासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. येथील जिल्हा व सत्र न्या- १ बी. व्ही. वाघ यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
बीड तालुक्यातील बहिरवाडी येथील अल्पवयीन मुलीशी अख्तर इब्राहिम शेख याने ओळख करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून दुचाकीवर कपिलधार, मांजरसुंबा, खोपोली येथे पळवून नेले. तेथे तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. या संदर्भात मुलीच्या वडिलांनी ९ फेब्रुवारी रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर मुलीचा जबाब घेण्यात आला. या जबाबानुसार या गुन्ह्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कलम वाढविण्यात आले. तपासामध्ये मुलीची वैद्यकीय तपासणी होऊन प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात ११ साक्षीदार तपासण्यात आले.

Web Title: Seven years imprisonment for sexual assault on minor girl

टॅग्स :jailतुरुंग